मुकेश अंबानींची मोठी घोषणा, पुढील वर्षापर्यंत भारतात सुरू होणार 5G सेवा


मुंबई : पुढच्या वर्षी म्हणजेच 2021 साली दुसऱ्या सहामाहीमध्ये 5G सेवा सुरू करण्याचे संकेत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेयरमन मुकेश अंबानी यांनी दिले आहेत. मुकेश अंबानी इंडिया मोबाईल काँग्रेस-2020 ला संबोधित करताना म्हणाले, खूप जलद असलेली 5G सेवा जलद गतीने सुरू करण्यासाठी पावले उचलण्याची गरज असून त्यासाठी नीतिगत पावले उचलली तरच आपण योग्य दरामध्ये सगळ्यांना 5G सेवा उपलब्ध करून देऊ शकतो.

जगभरात आज भारत सगळ्यात चांगल्या पद्धतीने डिजिटली जोडलेला देश आहे. 5G नेटवर्कला भारतात जलद गतीने आणण्याची गरज आहे. देशात आपली कंपनी जिओ 5G क्रांतीला सुरुवात करेल. देशात 2021 सालच्या दुसऱ्या सहामाहीमध्ये जिओ 5G क्रांतीला सुरूवात होईल, असा विश्वास मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला.

भारताला पुढे जाण्यात कोणीही रोखू शकणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजिटल इंडिया मिशनने आपत्ती आणि कोरोना महामारीच्या अडचणीवेळी जनतेला खूप साथ दिली. आपला यापुढेही देश डिजीटल ट्रान्सफोर्मेशनच्या मार्गावर अशाचप्रकारे पुढे जाईल, अशी प्रतिक्रिया मुकेश अंबानी यांनी दिली.

देशावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागला. बहुतेक लोक या काळात आपल्या घरातूनच काम करत होते. आमच्या हायस्पीड 4G कनेक्टिव्हिटी इनफ्रास्ट्रक्चर इंडियासाठी डिजीटल लाईफलाईन ठरल्याचे वक्तव्य मुकेश अंबानी यांनी केले.