
मीरत: भ्रष्टाचार ही भारतापुढील सर्वात बिकट समस्या असल्याने भ्रष्टाचारामुळे भारत खिळखिळा आणि दुर्बळ होत आहे; असे परखड प्रतिपादन तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांनी केले.

मीरत: भ्रष्टाचार ही भारतापुढील सर्वात बिकट समस्या असल्याने भ्रष्टाचारामुळे भारत खिळखिळा आणि दुर्बळ होत आहे; असे परखड प्रतिपादन तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांनी केले.
येथील विद्यार्थ्यांना संबोधित करताना दलाई लामा यांनी भारतीय सत्ताधारी आणि राजकारण्यांचे धिडवडेच काढले. स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधींसारख्या अनेक नेत्यांनी सर्स्वाचा त्याग करून स्वातंत्र्य लढ्यासाठी आपले आयुष्य वेचले. मात्र सध्याचे राजकारणी आपल्या पदांचा सत्तेचा गैरवापर करून स्वत:च्या तुंबड्या भरण्यात मश्गुल आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात पदोपदी भ्रष्टाचाराचा मुकाबला करावा लागत आहे; अशी स्पष्टोक्ती दलाई लामा यांनी केली.
नक्षलवाद हा देखील देशाला भेडसावणारा आंतराराष्ट्रीय प्रश्न असल्याचे सांगून दलाई लामा म्हणले की; नक्षलवाद हा सरकारच्या पक्षपाती धोरणामुळे चिघळलेला प्रश्न आहे. आपल्या मागण्यांसाठी नक्षलवाद्यांनी अंगिकारलेला निश्चितपणे अयोग्य आहे. मात्र त्यांच्या सर्वच मागण्यांकडे दुर्लक्ष करणे अन्यायकारक आहे; असे दलाई लामा यांनी निदर्शनास आणून दिले.
चीन- तिबेट प्रश्नाबाबत बोलताना दलाई म्हणाले; की हा राजनैतिक किंवा भूप्रदेशाच्या ज्या पराजयाचा प्रश्न नाही; तर ही समस्या तिबेटी लोकांच्या संस्कृती आणि अस्तित्वाशी निगडीत आहे. अनेक चीनी विचारवंत आणि लेखक, बुद्धिवादी चीनचा या प्रश्नातील आडमुठ्या धोरणाबाबत निषेध करू लागल्याचा दावाही दलाई लामा यांनी केला.