नेटवरील अश्लिल चित्रफितीविरोधात युरोपच्या संसदेत विधेयक

विज्ञानाच्या विसाव्या शतकातील माहितीतंत्रज्ञानाच्या चमत्काराची दुसरी बाजू निस्तरण्यासाठी युरोपमधील महिला संघटित झाल्या आहेत. इंटरनेट जोडलेल्या संगणकावर घाणेरड्या चित्रफितीसंदर्भात युरोपीय संसदेने कायदा करावा, यासाठी सर्व शक्तीनिशी केलेल्या या त्यांच्या प्रयत्नाला यश मिळत असून त्यावरील विधेयकावर मंगळवारी अंतीम चर्चा आहे. डच सदस्या श्रीमती कार्तिका तमारा लियोतार्द हिच्या पुढाकारांने हे विधेयक पुढे आले आहे. यापूर्वी चीनने फक्त इंटरनेटवरील आक्षेपार्ह दृष्ये दिसू नयेत, म्हणून कडक कारवाई केली आहे. त्यानंतर आइसलँडमधील संसदेने अशा स्वरुपाचे विधेयक संमत केले आहे.

चीनमधील कायद्यापेक्षा आईसलँडच्या कायद्याचे आम्हाला अधिक महत्व आहे, अशी प्रतिक्रिया ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरॉन यांनी व्यक्त केली आहे. त्या संदर्भात ते म्हणतात, लोकशाही पद्धती असलेल्या देशांनी हा विषय कसा हाताळावा याबाबत त्या देशाचा कायदा जगातील सर्वच देशांना मार्गदर्शन ठरणार आहे. गेले कित्येक महिने जगातील आम्ही सारे संसदीय राजकारणी काळजीत होतोच पण आता मार्ग निघाला आहे. युरोपीय संसदेने हा विषय यशस्वीपणे हाताळल्यावरच पुढचे काही बोलता येईल. पण ही अतिशय चांगली घटना आहे. माझ्या सारख्या युरोपातील काही कोटी पालकांचा जीव यामुळे भांड्यात पडला आहे. पण अजून अंतर फार कापायचे आहे.

माहितीतंत्रज्ञानाच्या वैज्ञानिक शोधामुळे सारे जग गेल्या पंचवीस वर्षात बदलून गेले आहे. त्यापूर्वीही माहितीतंत्रज्ञानाचे अनेक फायदे मिळत होते पण त्याचे स्वरुप मर्यादित होते. आता मोबाईल वापरणारांची संख्या जगाच्या लोकसंख्येच्या दिशेने निघाली आहे आणि पेंटियम मोबाईलही मोठ्या प्रमाणावर निरनिराळ्या स्वरुपात वापरात आहेत. संगणकही काही अब्जच्या संख्येत गेले आहेत. जगातील व्यवहार पंचवीस वर्षापूर्वीच्या तुलनेत काही पटींनी वाढले आहेत व ते सारे इंटरनेटशी जोडले गेले आहेत. अनेक विषय अगदी हाताशी आले आहेत. ही झाली या विज्ञानाची जमेची बाजू. माहितीतंत्रज्ञानाच्या चमत्काराची दुसरी बाजू म्हणजे अनेक संघटनांनी इंटरनेटवर निर्लज्ज चलचित्रे भरणे सरु केले आणि विज्ञानाच्या या उपयोगाचे बघता बघता ‘भस्मासुराच्या कारवायात’ रूपांतर व्हायला लागले.

युरोपच्या संसदीय समितीने याबाबत नियुक्त केलेल्या समितीने याबाबत सखोल अभ्यास केला त्यांनी युरोपमधील अठरा ते पंचवीस वयोगटातील पाचहजार मुलांच्या मुलाखती घेतल्या. त्यातून ज्या बाबी पुढे आल्या त्यामुळे ती समितीच नव्हे तर सारे युरोप हादरले. तरुणांचा स्वैराचार हा तर पहिलाच बळी होता पण निरनिराळ्या वयोगटातही ही समस्या पोहोचली होती.‘गे’मॅरेजवाल्यांच्या चळवळी एखाद्या आंतरराष्ट्रीय चळवळीचे स्वरुप धारण करू लागल्या. युरोप, अमेरिका व आफ्रिकामधील सरकारे त्यामुळे पडू लागली. येवढेच नव्हे तर कॅथलिक धर्मगुरु पोप आणि प्रोटेस्टंटधर्म गुरु आर्चबिशप ऑफ कँटरबरी हेही त्या समस्यातून सुटले नाहीत.

या सार्याे समस्या फारच किरकोळ वाटाव्यात अशा काही बाबी पुढे आल्या त्याम्हणजे नव्या पिढीत माणसाचे मांस खाण्याचा ‘शोक’ कोठे कोठे दिसू लागला. त्याची रेसीपीज आणि प्रत्यक्ष दृश्ये नेटवर दिसू लागली. त्याची मजल माणसाला मारून त्याची रेसीपी करण्यापर्यंत गेली. या संदर्भात नॅशनल सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ क्रूएल्टी अगेन्स्ट चिल्डेनच्या संचालिका अॅलन वॉर्डल यांनी सार्या् युरोपात याबाबत रान उठवण्याच्या दृष्टीने महत्वाची भूमिका पार पाडली. ब्रिटनमधील एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या फ्लोएला बेन्झामिन यांनी तर सार्या् ब्रिटनमध्ये आघाडी उघडली. त्या एक टीव्ही प्रेझेंटर असाच त्यांचा मूळचा परिचय पण लोकजागृतीच्या कामात गेल्या पंधरा वर्षात त्यांनी केलेल्या कामामुळे त्या ‘आँटी’ ओळखल्या जावू लागल्या. याबाबत त्या म्हणतात, जगातील कोणत्याही रोगापेक्षा महाभयंकर संसर्ग असलेल्या रोगाच्या उपचारासाठी आपण ही आघाडी उघडत आहोत. गेल्या पंचवीस वर्षातील ‘या’ प्रगतीबाबत जर पुढील पिढ्या आपल्याला दोष देणार असतील, की जे योग्यच आहे, त्यानी हा दोष कमीत कमी द्यावा, येवढाच या सार्याे प्रयत्नाचा उद्देश्य आहे.

‘केअर’संघटनेचे एक ज्येष्ठ पदाधिकारी डॅनिअल बूचर म्हणतात, मी जेंव्हा निष्पाप मुलांच्या घोळक्यात जातो, तेंव्हा जगाची माहिती असणारा मी प्रत्येक वेळी स्वतःला अतिशय अपराधी मानतो. मला असे अनेक सज्जन गृहस्थ माहीत आहेत की, आधीच्या पिढ्यांनी पुढच्या पिढ्यासाठी काय वाढून ठेवले आहे, याबाबत ते शरमिदे आहेत. पण युरोपीय संसद हा विषय चर्चेसाठी घेत आहे, यामुळे मी जगातील कोणत्याही मुलांच्या बरोबर खेळण्यात स्वतःला आनंदी समजेन. मी एकाच मुद्यावर खूष आहे की, जगात खोटे तरी ‘लाज’ शिल्लक आहे. आईसलंडमध्येही हा ठराव झाला तेंव्हा तेथील वातावरण फारसे पूरक नव्हते पण तेथील महिला पंतप्रधान श्रीमती जोहाना सिगूरदोतीर यांनी त्या संसदेत ज्या पद्धतीने भाषण केले तेंव्हा तेथील खासदारांनाच नव्हे तर त्या संसदेच्या इमारतीच्या भिंतींनाही म्हणे पाझर फुटला. यातील अतिशयोक्तीचा भाग सोडला तरी एक गोष्ट खरी की, एकविसाव्या शतकातही थोडे शहाणपण शिल्लक आहे.
 
युरोपमधील व अमेरिकेतील प्रत्येक देश आणि प्रत्येक राज्य कोसळत असल्याचे कारण नाहीसे करण्यासाठी युरोपीयन संसदेने कंबर कसली आहे. महिलांचे हक्क आणि स्त्रीपुरुष समानता यातील कलम १७ नुसार एका विशेष समितीने हा प्रस्ताव तयार केला आहे. यावर पुढील मंगळवारी मतदान होणार आहे. युरोपीय संसदेत एकूण ७५४ खासदार आहेत.

भारताच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या देशाला भगवान श्रीकृष्ण, भगवान गौतम बुद्ध आणि स्वामी विवेकानंद यांची परंपरा आहे तेथील खासदार काय करत आहेत ?. —-