टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग ढोणी आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्यातील शीतयुद्ध सर्वांना माहित आहे. अधून-मधून दोघेपण कधी-कधी एकमेकांची स्तुतीपण करीत असतात. नुकताच गांगुलीचा २१ कसोटी विजयांचा विक्रम मोडत ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी जिंकून ढोणी भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार ठरला. त्यानंतर, गांगुलीने मुक्तकंठाने ढोणीची प्रशंसा केली. पण मायभूमीतील कामगिरीच्या आधारावर यश गृहीत धरले जाऊ नये, असा सल्लाही त्याने दिला. त्यानंतर, दोनच दिवसांनी गांगुलीनं ढोणीवर पुन्हा हल्लाबोल केला असून यामुळे मात्र आता नवा वाद उपस्थित होणार असे दिसत आहे.
वीरूला वगळण्यामागे धोनी;गांगुलीची फटकेबाजी
धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग याची गेल्या दोन कसोटी सामन्यात चांग्लीकामगिरी झाली नसल्याने निवड समितीने त्याला डच्चू दिला आहे. असे असले तरी या सेहवागला वगळण्यास कॅप्टन कूल महेंद्रसिंग ढोणीचाच हात असल्याचा आरोप सौरभ गांगुलीने केला आहे. ढोणीच्या संमतीशिवाय निवड समिती वीरूला डच्चू देऊच शकत नाही, असे पण गांगुली म्हणाला.
यावेळी बोलताना गांगुली म्हणाला, ‘ आगामी काळात कांगारूविरुद्धच्या दोन कसोटींसाठी वीरेंद्र सेहवागला संघातून वगळल्याने मी हादरलो. मध्यंतरीच्या काळात तसे पहिले तर सचिन तेंडुलकर आणि ढोणीही द्विशतक वगळता फारशी चमकदार कामगिरी करू शकलेले नाहीत. निवड समितीने संघातून सेहवागला वगळण्यापूर्वी ढोणीकडे विचारना केली असणार आहे. त्यानंतरच सेहवागला वगळण्यात आले आहे. धोनीने जर सेहवागची संघाला गरज आहे असे संगितले असते तर त्याला डच्चू देण्यात आला नसता.’
