आव्हान तगडे, पण कठीण नाही- क्लार्क

नवी दिल्ली – टीम इंडियाविरुद्ध सलग दोन कसोट्यांमध्ये पराभूत झाल्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क त्याच्या कामगिरीवर थोडासा नाखूष आहे. मात्र, त्याने अद्याप धीर सोडलेला नाही. ‘टीम इंडियाने मालिकेत २-० ने आघाडीवर आहे. घरच्या मैदानावर तर सर्वचजन वाघ असतात हे आम्हालाही लागू होते. अशा स्थितीत २-२ ने मालिकेत बरोबरी करून पुनरआगमन करण्याची तयारी करीत आहोत. हे आव्हान तगडे आहे मात्र कठीण नाही.,’ असे क्लार्क यांनी स्पष्ट केले.

यावेळी पुढे बोलताना क्लार्क म्हणाला ‘कसोटी मालिकेत सहजपणे हार मानण्याचा ऑस्ट्रेलिया संघाचा स्वभाव नाही. मालिकेतील दोन सामने अद्याप खेळायचे आहेत आणि आमच्याकडे मालिकेत बरोबरीत येण्याची संधी आहे. आम्हाला पुढील दोन कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी करायची आहे आणि यावरच आम्ही लक्ष केंद्रित केले आहे.’

तसे पहिले तर आगामी काळात हे आव्हान ऑस्ट्रेलिया संघासाठी फार कठीण आहे, याची कल्पना आम्हला आली आहे. गेल्या काही दिवसापासून टीम इंडिया जबरदस्त फॉर्मात आहे. यामुळे घरच्या मैदानावर यजमानांना हरवणे सोपे राहिले नाही. त्यामुळे आगामी काळ हा सत्वपरीक्षा पाहणारा असणार आहे, असेही तो या वेळी म्हणाला.