नवी दिल्ली- पाकचे पंतप्रधान राजा परवेश अश्रफ यांच्याशनिवारी अजमेरच्या दौ-यावर येत आहेत. त्यांच्या या अजमेर यात्रेला होणारा विरोध चिघळत चालला आहे. भारतीय सैनिकाच्या शिरच्छेदाच्या निषेधार्थ दस्तरखुद्ध अजमेर दर्ग्याच्या व्यवस्थापनानेच त्यांना विरोध केला. त्यानंतर येथील नागरिकांनी पाकचे पंतप्रधान ज्याठिकानाहून जनंर आहेत, ते रस्ते धुऊन काढण्याची तयारी अजमेरच्या नागरिकांनीचालवली आहे.सर्व स्तरातून या दौ-याला विरोध होत असला तरी, परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी अश्रफ आणि त्यांच्या कुटुंबियासाठी भोजन समारंभाचे आयोजन केले आहे.
अजमेर यात्रेचा विरोध चिघळला; रस्ते धुऊन काढणार
अजमेरमधील स्थानिक दुकानदार आणि व्यापा-यांनीही पाकिस्तानी पंतप्रधानांच्या या दौ-याला विरोध केला आहे. येथील वकिलांनीही या दौ-याचा निषेध केला आहे. आपला विरोध दाखवण्यासाठी जो पर्यंत अश्रफ अजमेरमध्ये असतील तो पर्यंत कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. ज्या रस्त्याने ते अजमेर दर्ग्यात जातील आणि तेथून दर्शन घेऊन बाहेर येतील, तो संपूर्ण रस्ता नंतर पाण्याने धुऊन पवित्र करण्यात येणार असल्याचे व्यापा-यांच्या संघटनेने स्पष्ट केले.
पाक लष्कराने भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून अजमेर दर्ग्याच्या व्यवस्थापना या दौ-याचा निषेध करत असल्याचे, अजमेर शिरीफ दर्ग्याचे दिवाण सय्यद झैनुल अबेदिन अली खान यांनी दोन दिव्प्सापुर्वीच स्पष्ट केले आहे. शहीद हेमराजच्या कुटुंबीयांनी हा दौरा म्हणजे आमच्या मुलाचा बलिदानाचा अपमान असल्याचे म्हटले आहे. शिवसेनेनेही या दौ-याचा विरोध केला आहे.
दरम्यान, केंद्रीय परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी दौ-याबाबाबत विरोधकांना उत्तर देताना, पाहुण्यांचे आदरातिथ्य करणे ही आपली भारतीय संस्कृती असल्यानेच आम्ही ही आयोजन केले असल्याचे स्पष्ट केले आहे.
