ईटीव्ही मराठीने नाट्यरंग, क्राईम डायरी व सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस हे ३ नवे ब्लॉकबस्टर कार्यक्रम दाखल करत असल्याची घोषणा केल्याने आठवड्यातील प्राईमटाईम आता अधिक आकर्षक, थरारक व विनोदी झाला आहे. भारतीय टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच नाट्यरंगने दर्शकांसाठी टेलिव्हिजन स्वरुपात एकांकिका आणल्या आहेत. दर्शकांना घरच्या घरी चतुर्मितीय थिएटरचा अनुभव घेता येणार आहे. आदेश बांदेकर हा कार्यक्रमाचा सूत्रधार असणार असून तो कथानक व त्यातील पात्र यांच्याद्वारे कहाणी पुढे नेणार आहे.
‘ईटीव्ही मराठी’वर एक मार्चपासून मनोरंजनाची पर्वणी
नाट्यरंगची सुरुवात ११ मार्चपासून होणार असून तो दर सोमवारी व मंगळवारी प्रसारीत केला जाणार आहे. या कार्यक्रमात थिएटर व टेलिव्हिजन क्षेत्रातील नावाजलेले कलाकार काम करणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मूळ नाटकासोबत संलग्न कलाकार व तांत्रिक टीम टेलिव्हिजनवर पुनरागमन करणार आहे.
आदेश बांदेकर या कार्यक्रमाबाबत म्हणाले की; नाट्यरंग ही खास संकल्पना आपणास विचार करायला भाग पाडते. एखादी एकांकिका आधीच पाहिलेल्या थिएटर चाहत्यांकरिता ती टेलिव्हिजनवर पाहणे हा रोचक अनुभव असेल तर नव्या पिढीला कधीच न पाहिलेल्या एकांकिका पाहायला मिळणार आहेत. मराठी रंगभूमी हा विषय आमच्याकरिता जिव्हाळ्याचा असून ईटीव्हीने हे कार्यक्रम सादर करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आम्हांला अभिमान आहे.
क्राईम डायरी हा पोलिसी तपासाशी संबंधित वास्तवित कथांवर आधारीत कार्यक्रम आहे. १३ मार्चपासून हा कार्यक्रम दर बुधवार व गुरुवारी प्रसारीत होणार असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुबोध भावे करणार आहे. आठवड्याची सांगता सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेसने होईल. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता खानविलकर करणार असून हा कार्यक्रम पहिल्यापेक्षा अधिक रंगतदार असेल. स्पर्धकांच्या सादरीकरणावरुन त्यांचे परीक्षण करण्याची जबाबदारी सेलिब्रिटी परीक्षक सुदेश भोसलेंवर सोपविण्यात आली आहे. १५ मार्चपासून हा कार्यक्रम दर शुक्रवार व शनिवारी प्रसारित करण्यता येईल.
राजेश्वर क्राईम डायरी या कार्यक्रमाविषयी म्हणाले की, क्राईम डायरी या मालिकेत रहस्य आहे, नाट्य आहे, थरार व भय देखील आहे. या कार्यक्रमाचे महाराष्ट्रातील विविध ठिकाणी घडलेल्या वास्तव गुन्ह्यांवर आधारीत आहे. हा कार्यक्रम अपेक्षा नसलेल्या लोकांकडून गुन्हे कसे घडतात हे दाखविण्यावर लक्ष केंद्रीत करणार आहे.
ज्ञानेश भालेकर म्हणाले, बर्याच काळापासून सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस प्रेक्षकांचे मनोरंजन करत आलेला आहे व तीच परंपरा पुढे चालविण्याची संधी मिळाल्याने आम्हांला आनंद होत आहे.
