‘लव्ह जिहाद’बाबत भाजपाची दुटप्पी भूमिका: दिग्विजय सिंह


नवी दिल्ली: ‘लव्ह जिहाद’बाबत भारतीय जनता पक्षाची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केला आहे. एकीकडे भाजपाशासित राज्यांमध्ये ‘लव्ह जिहाद’ विरोधात कायदे करण्याची भाषा केली जात आहे तर दुसरकडे असे विवाह करणाऱ्यांना पक्षात पदे देऊन सन्मानित करण्यात येत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

भाजप दुटप्पीपणा करत आहे. एकीकडे तथाकथित ‘लव्ह जिहाद’ करणाऱ्या नेत्यांना पॅड देऊन सन्मानित करण्यात येत आहे जनतेला मूर्ख बनविण्यासाठी ‘लाव्हा जिहाद’ विरोधात कायदे करण्याची भाषा केली जात आहे, अशा अर्थाचे ट्विट दिग्विजय सिंह यांनी केले आहे. या ट्विटबरोबरच त्यांनी आचार्य प्रमोद यांचे एक ट्विट प्रसिद्ध केले आहे. या ट्विटमध्ये आचार्य प्रमोद यांनी म्हटले आहे की, देशभर ‘लव्ह जिहाद’ विरोधात कायदा आणि ‘देवभूमी’ उत्तराखंडमध्ये प्रोत्साहन; भाजपाची दुटप्पी भूमिका!

उत्तराखंडमध्ये अधिकृतरित्या नोंदणीकृत आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांना प्रोत्साहन म्हणून सरकारच्या समाजकल्याण विभागामार्फत ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जात आहे. दुसरीकडे शेजारच्याच उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार आगामी अधिवेशनात लव्ह जिहादला विरोध करणारा ‘धर्मांतरण प्रतिषेध कायदा २०२०’ संमत करून घेणार आहे.