हैदराबाद- येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवरील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने एक डाव व १३५ धावाने विजय मिळवित कांगारुना चारी मुंड्या चित केले. टीम इंडियाने चार कसोटीच्या मालीकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. आगामी काळात कांगारुना मालीकेतील पराभव टाळण्यासाठी दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. चेतेश्वर पूजाराला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
कालच्या २ बाद ७४ धावावरून मंगळवारी पुढे खेळ सुरु केला. त्यानंतर लगेचच शर्माच्या चेंडूवर वाटसनला कर्णधार धोनीने अलगद टिपले. वाटसनला केवळ नऊ धावा करता आल्या. त्यांनतर रवींद्र जडेजाने कर्णधार मायकल क्लार्कला बोल्ड केले. त्याला १६ धावा करता आल्या.त्यानंतर मात्र ऑस्ट्रेलियाच्या फलदाजनी हजेरी लावण्याचे काम केले. त्यानंतर कालपासून खेळत असलेला कोवानही ४४ धावा काढून जडेजाच्या गोलंदाजीवर लगेचच बाद झाला. त्यावेळी कांगारूची अवस्था सहा बाद १११ अशी झाली होती.
आर अश्विन याने ऑस्ट्रेलियाला सातवा झटका दिला. ग्लॅन मॅक्सवेल अश्चिनची फिरकी समजू शकला नाही. मॅक्सवेल याने ८ धावा केल्या. त्यानंतर वेड आणि पोन्तीनसन लागेचच बाद झाले. ऑस्ट्रेलियाचा डाव केवळ १३१ धावावर आटोपला. कागारुला एक डाव १३५ धावांनी पराभव स्वीकारवा लागला. भारताकडून अश्विनने ४,जडेजाने ३,शर्माने १ गडी बाद केला.
सामन्याच्या चौथ्या दिवशी रवींद्र जडेजाचाही जादू चांगलाच चालत आहे. दरम्यान, हैदराबाद टेस्टमध्ये टीम इंडियाचा नवा मिस्टर रिलायबल चेतेश्वर पुजाराच्या शानदार २०४धावा आणि मुरली विजयच्या १६७ धावांच्या बळावर भारताला विजय मिळविता आला.