आसाम, मेघालयात भूकंप

करीमगंज – आसाम, मेघालय या राज्यांना शनिवारी सकाळी भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर सेक्लवर ५.२ इतकी मोजण्यात आली आहे. या धक्कायामुळे कसलीही जीवित अथवा वित्त हानी झाली नसल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या सूत्राने दिली.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सातच्या सुमारास हा भूकंपाचा धक्का बसला. आसाममधील करीमगंज गावा नजिक या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. यामध्ये अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

दरम्यान शिलाँगमध्ये काही भागांना या भूकपाचा धक्का जाणवला. त्याची तीव्रता अधिक असल्याने या परिसरातील इमारतींना तडे गेले आहेत.

या भूकंपाचा धक्का इटानगर, कोहिमा, गुवाहाटी, आगरताळा या शहरांलाही बसला आहे. धक्का जाणवल्यानंतर नागरिक घरातून बाहेर पळत आले. भुकंपानंतर काही काळ नागरिकांत भीतीचे वातावरण होते.