महिला बँकेला विशेष परवानगीची गरज नाही – आर.बी.आय.

मुंबई दि.१ – अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी काल अर्थसंकल्प सादर करताना खास महिलांसाठी विशेष बँकेचा प्रस्ताव सादर केला आहे . ही बँक पब्लिक सेक्टर बँक म्हणूनच सुरू केली जाणार असल्याने त्याला सध्या अस्तित्वात असलेली पब्लिक सेक्टर बँकींगचीच मार्गदर्शक तत्त्वे लागू होऊ शकणार आहेत. यामुळे ही बँक सुरू करण्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागणार नाही. परिणामी ती लगेच सुरू होऊ शकेल असे रिझर्व्ह बॅकंचे उप गव्हर्नर आनंद सिन्हा यांनी स्पष्ट केले आहे.

पी. चिदंबरम यांनी अशा महिलाप्रणीत बँकेची घषणा करतानाच त्यासाठी १ हजार कोटी रूपये सुरवातीलचे भांडवल म्हणून राखून ठेवले असल्याचेही जाहीर केले होते. मात्र मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूटशन मधील तज्ञांच्या मते प्रस्तावित महिला बँकेची संकल्पना कितीही चांगली असली तरी प्रत्यक्ष कार्यवाहीत अनेक आव्हाने उभी राहू शकतात.