अशी बदलू शकता GBoard Keyboard द्वारे व्हॉट्सअ‍ॅपची भाषा ?


व्हॉट्सअॅप हे अॅप सध्याच्या घडीला सर्वांच्या पहिल्या पसंतीचे बनले असून लॉकडाऊनच्या काळात याच व्हॉट्सअॅपने मोलाची भूमिका बजावली. हे विनामूल्य सोशल मीडिया मेसेंजर अ‍ॅप यूजर्सना स्टोरीज, व्हिडिओ, मल्टीमीडिया, एपीके फाइल्स, डोकमेंट्स, व्हॉइस नोट्स, व्हिडिओ कॉल आणि बरेच काही अपलोड करण्याची सोय व्हॉट्सअॅपवर उपलब्ध आहे. 40 हून अधिक भाषांमध्ये आणि 60 पर्यंत भाषांमध्ये अँड्रॉईडवर जगभरात व्हॉट्सअ‍ॅप उपलब्ध आहे. पण आपण सामान्य नियम म्हणून, तो आपल्या फोनची भाषा फॉलो करतो.

उदाहरणार्थ, आपल्या फोनची भाषा आपण मराठी केली तर व्हॉट्सअ‍ॅप आपोआपच मराठीत येईल. दरम्यान, एकूण 11 स्थानिक भाषांमध्ये व्हॉट्सअ‍ॅप भारतात उपलब्ध आहे. पण, आपल्या फोनची भाषा इंग्लिश असेल, पण जर आपल्याला इंग्रजी येत नसेल तर ही सेटिंग करा आणि व्हॉट्सअ‍ॅपवर आपल्या आवडीच्या भाषेमध्ये चॅट करा. GBoard वापरुन आपण व्हॉट्सअ‍ॅपवरील भाषा बदलू शकता. आपण ‘हे’ सोप्पे पर्याय पाहून GBoard डाउनलोड करून आपल्या स्थानिक भाषेत व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट करू शकतात.

अशा प्रकारे बदलाल तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपची भाषा

  • सर्वप्रथम गूगल प्ले-स्टोरवरून Gboard अ‍ॅप डाउनलोड करा.
  • हे अॅप इन्स्टॉल केल्यानंतर, तुमच्या मोबाईल मेनूमध्ये किंवा Home Page वर Gboard अ‍ॅपचे चिन्ह दिसेल.
  • त्यांनतर ट्रान्सलेट अ‍ॅप ओपन करून जी काही परवानगी मागतील ती द्या.
  • त्यांनतर व्हॉट्सअ‍ॅप चॅट ओपन करा.
  • तिथे Google चे बटन असेल ज्याच्यावर क्लीक केल्यावर Google Translate चा ऑप्शन दिसेल.
  • त्यानंतर आपली पहिली भाषा निवडा आणि दुसरी भाषा इंग्लिश निवडा व मराठी ते इंग्रजी भाषेत व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट करा.