
कोलंबो दि. २४ – श्रीलंकेत सध्या भात पिकाची काढणी करण्याची वेळ आली आहे मात्र तेथे मजुरांची प्रंचड चणचण जाणवत असल्याने श्रीलंकेने भारतीय मजुरांना वर्क व्हीसा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. श्रीलंकन नागरिक प.आशिया, सिंगापूर, इटली आणि द. कोरियात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करत आहेत आणि त्यांना अटकाव करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. परिणामी श्रीलंकेत आता शेतमजुरांची मोठीच टंचाई निर्माण झाली आहे असे कृषीमंत्री महिदा यापा अबायवर्धना यांनी जाहीर केले आहे.
