व्हॉट्सअॅपच्या Store Management Toolच्या माध्यमातून अनावश्यक फाइल्स डिलीट करणे होणार सोप्पे


तरुणाईच्या सर्वाधिक पसंतीचे व्हॉट्सअॅप हे आपल्या युजर्ससाठी दरवेळेस नव-नवे फिचर्स आणले जातात. त्यानुसार व्हॉट्सअॅपकडून एक नवे अपडेट लॉन्च केले जाणार असल्याची घोषणा केली आहे. स्टोर मॅनेजमेंट टूल असे या अपडेट फिचरचे नाव असून जे कंपनीने रिडिझाइन केले आहे. सध्या Storage Managemeny Tool व्हॉट्सअॅपकडून लॉन्च केले गेले आहे. तर हे फिचर पुढील आठवड्यापासून संपूर्ण जगभरात उपलब्ध करुन दिले जाणार आहे.

या फिचरबाबत कंपनीने दावा केला आहे की, युजर्सला फोनमधील चॅट, मीडिया फाइल्स डिलीट करणे Storage Management Tool रोलआउट झाल्यास सोपे होणार आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअॅपवरील चॅट किंवा मेसेजसह मीडिया फाइल्स सोप्प्या पद्धतीने आणि बल्कमध्ये युजर्सला डिलिट करता येणार आहेत. Easy Cleanup चे ऑप्शन सुद्धा कंपनीकडून दिले जाणार आहे. म्हणजेच जेवढी मोठी फाइल्स आणि मीडिया कंन्टेंट बहुतांश वेळा फॉरवर्ड केला गेला आहे किंवा मीडिया कंटेट बद्दल युजर्सला माहिती उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

त्याचबरोबर फोनमध्ये कमी साइज ते मोठ्या साइज मधील फाइल्स एकाच साइजमध्ये प्लेस केल्या जाणार असल्यामुळे सर्च करण्यास सोपे होणार आहे. तर स्टोर मॅनेजमेंट टूल फाइल डिलिट करण्यापूर्वी प्री-व्यू ऑप्शन ही दाखवले जाणार आहे. हे ऑप्शन वापरण्यासाठी युजर्सला व्हॉट्सअॅप सेटिंग्समध्ये जावे लागणार आहे. तेथे तुम्हाला स्टोरेज आणि डेटाचा ऑप्शन दाखवला जाणार आहे. यानंतर मॅनेज स्टोरेज ऑप्शन एक्सेस करता येणार आहे.