मुंबई दि.२३ – राज्याच्या कांही भागात असलेल्या भयंकर दुष्काळाची दखल घेऊन महाराष्ट्र पोलिसांनी दुष्काळ निवारणासाठी १५ कोटी रूपयांची रक्कम शासनाला देण्याचा निर्णय घेतला असल्याचे वरीष्ठ पोलिस अधिकार्यां नी सांगितले. राज्यातील हवालदार आणि उपनिरीक्षक दर्जाचे कर्मचारी या महिन्यातील १ दिवसांचा पगार तर सहाय्यक निरीक्षक व वरीष्ठ अधिकारी दोन दिवसांचा पगार यासाठी देणार आहेत.
महाराष्ट्र पोलिसांचे दुष्काळनिवारणासाठी १५ कोटी
दुष्काळ निवारणासाठी पगाराचा कांही हिस्सा देण्याची कल्पना कांही दिवसांपूर्वीच मांडली गेली होती असे सांगून हे अधिकारी म्हणाले की राज्यात एकूण १ लाख ८० हजार पोलिस कर्मचारी आहेत आणि १ आणि दोन दिवसांच्या पगारातून १५ कोटींची रक्कम जमा होणार आहे.
दोन दिवसांपूर्वीच राज्याच्या मंत्रीमंडळाने १ महिन्याचा पगार दुष्काळ निवारणासाठी देण्याची घोषणा केली आहे.
