दक्षिण कोरियन इलेक्ट्रोनिक कंपनी सॅमसंग यंदाच्या वर्षात पाच नवी उत्पादने बाजारात आणणार असल्याचे सांगितले जात असून या उत्पादनांची पहिली झलक फेब्रुवारीत होणार्याच मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सादर केली जाईल असेही सूत्रांकडून समजते.
सॅमसंगची पाच नवी उत्पादने येत्या वर्षात बाजारात
कंपनीने अद्यापी घोषणा न केलेली चार उत्पादने जीएल बेंचमार्कच्या डेटाबेसवर कांही काळ दिसली होती. जीएल बेंचमार्कचा वापर ग्राहक स्मार्टफोन आणि टॅब्लेटच्या माहितीसाठी मोठ्या प्रमाणावर करतात. यावेळी सॅमसंग गॅलॅक्सी फॉनब्लेट, गॅलॅक्सी स्टार, गॅलॅक्सी पॉकेट, गॅलॅक्सी नोट ८.० या उत्पादनांचे डिटेल्स दाखविण्यात आले होते असे समजते.
कंपनीचे पाचवे हाय एंड उत्पादन अजून गुलदस्त्यात आहे मात्र ते नव्या टॅब्लेटसारखेच असेल असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत. गॅलेक्सी नोट आयपॅड मिनीला कडवी टक्कर देईल तर नवे उपकरण डयएल सीम स्मार्टफोन असेल असे सांगितले जात आहे.
