प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनात बहिणींनाही समान हक्क

मुंबई: हिंदू वारसा हक्क कायद्यात १९९४ मध्ये झालेल्या दुरूस्तीनुसार वडिलोपार्जित प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करताना भावासोबतच बहिणींना देखील समान हक्क देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

या निर्णयानुसार महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन करताना अधिनियम १९९९ मध्ये प्रकल्पग्रस्त व्यक्तींच्या व्याख्येत सुधारणा करण्यात येईल. अधिनियमात प्रत्येक भावाला या शब्दाच्या पुढे ‘तसेच बहिणीला’ या शब्दाचा अंतर्भाव करण्यात येईल व ’मृत भावाचा’ या शब्दापुढे ’किंवा बहिणीचा’ हा शब्द अंतर्भूत करण्यात येईल.