प्रियंका थिरकणार आयटम सॉंगवर

अभिनेत्री प्रियंका चोप्रा आगामी काळात दिग्दर्शक संजय गुप्ताच्या ‘शूटआउट ऐट वडाला’ या सिनेमामध्ये आयटम सॉंग करणार आहे. या सिनेमात पीसीने सुरुवातीला आयटम सॉंग करण्यास नकार दर्शविला होता. मात्र पुन्हा ती आयटम सॉंग करण्यास तयार झाली आहे. त्यासाठी मात्र प्रियंकाने लिरिक्स चेक केल्यानंतर तिने तयारी दर्शवली आहे.

अभिनेत्री प्रियंका ‘जंजीर’ सिनेमात प्रमोशनल सॉन्ग करणार आहे. काही दिवसापूर्वीच संजयने त्याच्या सिनेमात एक आयटम सॉन्ग सादर करण्यासाठी पीसीला अप्रोच केला होता. प्रियंकाने त्यासाठी गाण्याच्या लिरिक्स चेक केल्यानतर या गाण्यात काम करण्यास नकार दर्शविला होता. त्यानंतर बदल करण्यात आल्यानंतर पीसीने ‘बदमाश बबली…’ या सॉन्गवर थिरकण्याची तयारी दर्शविली आहे.

सूत्रोंने दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका डांस केल्यानतर पाठीमागे हे गाणे ऐकण्यास मिळणार आहे. हे गाणे अनु मलिकने कंपोज केले आहे. तर हे गाणे सुनिधि चौहान गायनार आहे.तसे पहिले तर हे सॉन्ग अभिनेत्री जीनत अमानच्या ‘आप जैसा कोई मेरी जिंदगी…’ आणि परवीन बॉबीच्या ‘जीते हैं शान से…’ या गाण्याप्रमाणे शूट केले जाणार असल्याचे समजते.