मुंबई: शिवसेना कार्याप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागितलेल्या टाळीची महाराष्ट्र नवनिर्माण सेनाध्यक्ष राज ठाकरे यांनी कोल्हापूरच्या सभेत ‘टोलवाटोलवी’ केल्यावर उद्धव यांनी आता याबद्दल ‘वेळ आल्यावर बोलू;’ अशी भूमिका घेतली आहे.

उद्धव यांनी राज यांच्याकडून टाळीची अपेक्षा व्यक्त केल्यानंतर या मनोमीलनाच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेकांच्या आशा दुणावल्या. मात्र कोल्हापूरच्या सभेत राज यांनी ‘एकला चलो रे’चा नारा लावत उद्धव यांच्या प्रस्तावाची खिल्ली उडविली. असल्या चर्चा मेळावे घेऊन करायच्या नसतात; असा टोलाही त्यांनी लगावला.
त्यानंतर लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांच्यासारख्या ज्येष्ठ शिवसेना नेत्यांनी राज यांच्यावर टीकाही केली. मात्र उद्धव यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. याबाबत उद्धव यांना विचारले असता त्यांनी ‘ही टेबल टेनिसची मेच नाही. मी याबद्दल योग्य वेळ आल्यावर बोलेन;’ असे सांगितले.
राज यांनी उद्धव यांचा प्रस्ताव साफ फेटाळला नाही. त्यामुळे अजूनही या दोन्ही सेना एकत्र येतील; अशी आशा अनेक ‘सैनिकां’ना आणि दोन्ही सेनेच्या हितचिंतकांना आहे.