चार वर्षांनंतर राज्यमंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त

मुंबई: मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहू लागल्याने राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. मंत्रिमंडळात काँग्रेसच्या वाट्याच्या काही जागा अद्याप शिल्लक असल्याने त्या भरण्यासाठी हायकमांडने हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांतच मुख्यमंत्री नव्या मंत्र्यांच्या नावांची निश्चिती करतील असे समजते.

सध्या मंत्रिमंडळात काँग्रेसच्या एकूण तीन जागा रिक्त आहेत. एक कॅबिनेट तर दोन राज्यमंत्री दर्जाच्या या जागा आहेत. सन २००९ च्या निवडणुकांपासून काँग्रेसने या जागा रिक्तच ठेवल्या होत्या. मात्र २०१४ ची निवडणूक जवळ आल्याने काँग्रेसला अखेर चार वर्षानंतर या जागा भरण्यासाठी मूहूर्त मिळाला आहे.