
मुंबई – राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ऑनलाईन डिजिटल शॉपिंग अॅप अॅमेझॉनमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. अॅमेझॉनचे सर्वेसर्वा जेफ बेझोस यांनी या मनसेच्या मागणीचा दखल घेतली आहे. मनसेला यासंदर्भातील एक अधिकृत ई-मेल पाठवण्यात आला आहे. आज मुंबईत अॅमेझॉनचे एक शिष्टमंडळ दाखल झाले असून मनसेच्या पदाधिकाऱ्यांची ते भेट घेणार आहे.
‘मनसे’ दणका दिल्यानंतर जेफ बेझॉस नरमले, अॅमेझॉन अॅपमध्ये होणार ‘मराठी’चा समावेश
अॅमेझॉनला मराठी भाषेच्या वापराविषयी मनसेचे अखिल चित्रे यांनी ई-मेल पाठवला होता. या इमेलला बेजॉस यांच्या वतीने ‘अॅमेझॉन.इन’च्या जनसंपर्क विभागाने प्रतिसाद दिला आहे. बेजॉस यांना आपला मेल मिळाला आहे. अॅमेझॉन अॅपमधील त्रुटींमुळे आपल्याला जो मनस्ताप झाला, त्याबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करतो. संबंधित विभागाला तुमच्या तक्रारीबद्दल कळवण्यात आली असून लवकरच त्यावर कार्यवाही केली जाईल, असे अमेझॉनने स्पष्ट केले आहे.
ॲमेझाॅनच्या डिजिटल सेवेत (Trading App) मराठीला प्राधान्य देण्याच्या मनसेच्या आग्रही मागणीची ॲमेझाॅनचे संस्थापक जेफ बेझॉस ह्यांच्या प्रतिनिधींनी घेतली दखल. अमेझॉनचं शिष्टमंडळ आज मुंबईत… राजसाहेब म्हणतात तसं… तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम असाल तर जग तुमची दखल घेतं. @mnsadhikrut pic.twitter.com/tpPGCCJyDt
— Akhil Chitre (@akhil1485) October 20, 2020
दरम्यान मनसेचे अखिल चित्रे यांनी ॲमेझॉनच्या डिजिटल सेवेत मराठीला प्राधान्य देण्याच्या मनसेच्या आग्रही मागणीची ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस ह्यांच्या प्रतिनिधींनी दखल घेतली असून आज अमेझॉनचे शिष्टमंडळ मुंबईत… राजसाहेब म्हणतात तसे… तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम असाल तर जग तुमची दखल घेते, अशा आशयाचे ट्विट केले आहे. दरम्यान मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी 15 ऑक्टोबर रोजी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांच्या मुंबईतील संबंधित कार्यालयांना भेटी दिल्या होत्या. तसेच मराठी भाषेच्या वापराबाबत मागणी केली होती आणि तसे न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता.
