पुणे: अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे तीन वर्षासाठी येणार आहे. यामुळे साहित्य महामंडळाच्या विद्यमान अध्यक्ष आणि कार्याध्यक्षामध्ये मतभेद असले तरी मसापच्या अध्यक्षांअच्च्या संमतीनेच साहित्य महामंडळाकडे मसापच्या तीन प्रतिनिधींची नावे पाठविण्याचा निर्णय मसापच्या मंळवारच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मसापचे प्रमुख कार्यवाह प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
साहित्य महामंडळाचे कार्यालय दर तीन वर्षांनी बदलत असते. त्यानुसार ते आता मुंबईतून पुण्यात (महाराष्ट्र साहित्य परिषद) येत आहे. त्याच्या अध्यक्षपदावरून सध्या चांगलाच वाद सुरू आहे. पद मिळविण्यासाठी प्रत्येकाचे वेगवेगळे प्रयत्नही सुरू आहेत. अशा स्थितीत परिषदेचीच घटना सर्वोच्च मानून त्यानुसार डॉ. माधवी वैद्य, प्रा. मिलिंद जोशी आणि सुनील महाजन ही तीन नावे प्रतिनिधी म्हणून महामंडळाकडे पाठविण्यात येणार असल्याची चर्चा साहित्य वर्तुळात सूरू होती.
मात्र असे न करता सहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांच्या संमतीनेच महामंडळावर नेमायच्या तीन प्रतिनिधींची नावे पाठविण्याचा निर्णय मसापच्या बैठकीत झाल्याचे प्रा. जोशी यांनी स्पष्ट केले.