विवेक, नेहा शर्मावर डासांचा हल्ला

बॉलीवुडमध्ये आता इंटीमेट सीन करणे नवीन गोष्ट राहिली नाही. आता ती सर्वांनी सवयची करून घेतली आहे. मात्र अभिनेत्री नेहा शर्मा आणि विवेक ओबेरॉय बोल्ड सींन करीत असताना त्यांची चांगलीच अडचण झाली. ‘जयंतीभाई की लव स्टोरी’ या सिनेमात विवेक आणि नेहा एक बेडवरील सींस करीत असताना अचानक त्यांच्यावर डासांने हल्ला केला त्यामुळे ते घाबरून गेले होते.

झाले असे की या सिनेमात दोघावर आधारित एक हॉट सीनची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली होती. तसे पाहिले तर अभिनेत्री नेहा बॉलीवुड मध्ये नवी आहे. त्यामुळे नेहा पहिलेच घाबरली होती. दोघेजण सीन साठी बेडवर झोपले होते. त्यावेळी त्यांच्यावर विविध एंगल्सने शॉट शूट करण्यात आले.

अचानकच शॉट करतेवेळी नेहावर डासांने हल्ला केला त्यामुळे ती घाबरून गेली होती. अचानक तिला काय होते हे समजत नव्हते. शॉट ओके झाल्यानंतर मात्र नेहाची पाठ लाल झाली होती. एकंदरीत अचानक झालेल्या हल्ल्यामुळे तिचे बेहाल झाला होते. तिची लाल झालेली पाठ पाहून सेटवरील सर्वचजन घाबरून गेले होते. मात्र त्याचे कारण शोधल्यानंतर मात्र सर्वचजन पोट धरून हसत होते.