‘नजर’ आणि ‘कसक’ या सिनेमातून नाव कमविणारी पाकिस्तानी अभिनेत्री मीरा आता ‘ओम अल्लाह’ या सिनेमामुळे खूपच उत्साहित आहे. या सिनेमाची शूटिंग मथुरामध्ये झाली आहे. येत्या डिसेबरमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. भारतात ती तिची प्रमुख प्रतिस्पर्धी कैटरीना कैफला मानते. अभिनेत्री मीराच्या मते अभिनेता सलमान खान तिच्यासाठी खास असून आगामी काळात लग्न करायचे तर सलमान सोबतच नाहीतर तिने लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे.
लग्न करणार तर सलमान सोबतच – मीरा
महेश भट्टच्या ‘नजर’ या सिनेमातून तिने भारतातील करियरला सुरुवात केली होती. आतापर्यंत मीराने १०३ पाकिस्तानी सिनेमात अभिनय केला आहे. तिच्या अभिनयासाठी पाक राष्ट्रपतिच्या हस्ते तिला ‘सितारा इम्तियाज’ हा अवार्ड मिळाला आहे. भारत-पाक यांच्यातील तनावपूर्ण संबंधाबाबत बोलताना अभिनेत्री मीरा म्हणाली की, या तनावपूर्ण संबंधाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मात्र दोन्ही देशांनी त्यांच्यातील संबध सुधरण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
दोन्ही देशांनी त्यांच्यातील संबध सुधारण्यासाठी एक म्यूजिक अल्बम तयार केला आहे. त्या मध्ये दोन्ही देशाच्या कलाकाराचा समावेश आहे. ती १५ मार्च रोजी दिल्ली येथील शांति मार्चमध्ये सहभागी होण्यासाठी येणार आहे. हा कार्यक्रम तिचा भाऊ सैयद अब्बास आणि आई सैयद बुखारी यांनी आयोजित केला आहे.
