अभिनेता संजय दत्त मुन्नाभाईच्या टीम सोबत जोडला गेला आहे. गेल्या काही दिवसापासून अभिनेता संजय दत्त आणि मुन्नाभाईच्या टीम यांच्यामधील संबध ताणले गेले होते. मात्र काही दिवसापासून त्यांच्यातील संबध पुन्हा सुधारले असून लवकरच तो दिग्दर्शक राजकुमार हिरानीच्या आगामी काळात येत असलेलेल्या ‘ पीके’ या सिनेमातून झळकणार आहे.
अभिनेता संजय दत्त हैदराबाद मध्ये ‘पुलिसगीरी’ या सिनेमाची शूटिंग करीत असताना त्याला दिग्दर्शक राजकुमार हिरानीचा फोन आला होता. त्यावेळी त्याच्याकडे ‘पीके’ मध्ये काम करणार का अशी विचारणा करण्यात आली होती. त्यानंतर संजय दत्त गेल्या काही दिवसापासून सिनेमाच्या शूटिंगसाठी हैदराबाद आणि जयपुर अशा फे-या मारीत होता.
संजयने आतापर्यंत हिरानीच्या सिनेमाचे बरेचसे शूट पूर्ण केले आहे. ‘पुलिसगीरी’ सिनेमाचे शूटिंग तो मार्च महिन्यानंतर करणार आहे. सध्या त्याने ‘पीके’ सिनेमाचे शूट पूर्ण करण्याचे मनावर घेतले आहे. हिरानीच्या ‘पीके’ या सिनेमात आमिर खान आणि संजय दत्तच्या प्रमुख भूमिका आहेत. संजयने जयपुरमध्ये ‘पीके’ सिनेमाचे काम सुरु केले आहे.