
नागपूर: भारत सरकारच्या पुरातत्व विभागाला तब्बल बारा हजार वर्षांपूर्वींचे चित्र सापडले आहे. मध्यप्रदेश-महाराष्ट्र सीमेवरील सातपुडा पर्वतराजीतील बेतुल जवळ दगडी निवार्यात या कलाकृती कोरण्यात आल्या आहेत.

नागपूर: भारत सरकारच्या पुरातत्व विभागाला तब्बल बारा हजार वर्षांपूर्वींचे चित्र सापडले आहे. मध्यप्रदेश-महाराष्ट्र सीमेवरील सातपुडा पर्वतराजीतील बेतुल जवळ दगडी निवार्यात या कलाकृती कोरण्यात आल्या आहेत.
पुरातत्व खात्याचे एक पथक गवळीगड डोंगरराजीत तापी पूर्णा खोर्यात हे पथक गेले काही दिवस खोदकाम आणि संशोधन करीत आहे. तेथे त्यांना एका गुहेत ही दगडावर केलेली ७१ चित्रं सापडली आहेत. जागतिक दृष्टीने महत्वाच्या असलेल्या भोपाळ जवळील भिंबेटका इतकेच महत्व आता या स्थळाला मिळणार आहे.
या भागात जुने दगडी निवारे सापडले असून त्यात छतावर आणि जमीनवर या कलाकृती कोरण्यात आल्या आहेत. त्यात विविध रंगसंगतीने सजवण्यात आल्या असून चाळीस किलोमीटर परिसरात विखुरेल्या या दगडी निवार्यांमध्ये सर्वत्र या कलाकृती आढळून येतात. या कलाकृती अतिप्राचीन आहेत. त्यात विविध स्वरूपाची चित्रे आहेत परंतु त्यांचे नेमक्या स्वरूपाविषयी आत्ताच कोणतेही भाष्य करणे उचित ठरणार नाही असे या ठिकाणी संशोधक म्हणून काम करणारे साहू यांनी सांगितले.
यात काही ठिकाणी शंख लिपीतील मजकूरही आहे. त्यावरून ही भाषा सुमारे १२ हजार वर्षांपूर्वीची असावी असा प्राथमिक निष्कर्ष आहे. या प्राचीन दगडी निवार्यांमध्ये लोकांनी अलिकडच्या काळात मोठी नासधूस केल्याचेही निष्पन्न झाले असून या नुकसानीपासून हे स्थळ वाचवण्याची गरज आहे अन्यथा हा अतिप्राचीन ठेवा नष्ट होण्याची भीती आहे.