अन्न सुरक्षा कायदा आणणार- सोनिया गांधी

पालघर- देशात आजही कुपोषणाची मोठी समस्या असून, त्यावर मार्ग काढण्यासाठी आमचे सरकार अन्न सुरक्षा कायदा आणणार असल्याचे यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज पालघरमध्ये स्पष्ट केले. तसेच यूपीए सरकार महिलांच्या आरोग्यासाठी विविध योजना आणत असून त्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे त्या म्हणाल्या.

पालघरमध्ये ग्रामीण आरोग्य योजनेचे उदघाटन सोनिया गांधी यांच्या हस्ते आज येथे झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते, मंत्री उपस्थित होते.

सोनिया म्हणाल्या की; महाराष्ट्रात लहान मुलांच्या आरोग्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. देशाच्या उर्वरित भागात आजही आरोग्याबाबत मोठ्या समस्या आहेत. अनेक लोकांना वेळेत व योग्य उपचार मिळत नाहीत. मात्र यूपीए सरकार यासाठी कटिबद्ध आहे. विशेषत महिलांच्या स्वास्थासाठी आमचे सरकार विशेष लक्ष देईल. त्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत.

आरोग्याबरोबरच देशात कुपोषण ही गंभीर समस्या असून, त्यावर मात करणे गरजेचे आहे. त्यासाठी आमचे सरकार लवकरच अन्न सुरक्षा विधेयक संमत करणार आहे. या योजनेमुळे देशात कोणीही भुकेले व उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली जाईल, असा विश्वास गांधी यांनी व्यक्त केला.

त्या पुढे म्हणाल्या की; काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज पालघरमध्ये लहान मुलांसाठीच्या हेल्थ स्क्रिनिंगसंदर्भातील एका राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेची सुरुवात केली. मुलांना जन्मजात असणार्‍या आजारांवर उपचार करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. जवळपास 20 हजार मुलांना या उपक्रमाचा फायदा होईल. पालघर नवा जिल्हा म्हणून घोषित करण्यात येईल असं सर्वाना वाटत असतांना अशी कोणतीही घोषणा सोनिया गांधी यांच्याकडून करण्यात आली नाही.

यावेळी देशातील 40 टक्के बालकं आजही कुपोषित असल्याचचे सोनिया गांधी यांनी सांगितलले. तसेच अजूनही वेगळवेगळ्या आजाराने बालमृत्यू होत आहेत. बालमृत्यूच्या प्रमाणावरही सोनिया गांधी यांनी चिंता व्यक्त केली. या योजना जेव्हा जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचतील तेव्हाचं याचा खरा आनंद होणार असल्याचचे सोनिया गांधी यांनी यावेळी सांगितले.