कोरोना : देशातील रुग्णांचा आकडा 60 लाखांवर, 24 तासात 1039 जणांचा मृत्यू

देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, हा आकडा आता 60 लाखांच्या पुढे गेला आहे. 60 लाख कोरोनाग्रस्त असणारा भारत हा जगातील दुसरा देश आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासांमध्ये 82,170 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. यासोबतच एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 60,74,702 झाली आहे.

मागील 24 तासात 1,039 लोकांचा व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 95542 लोकांना आपला जीव गमावावा लागला आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे, देशातील 50 लाखांपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 50,16,520 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील 24 तासात 74,893 रुग्ण बरे झाले आहेत. तर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 9,62,640 आहे.

भारताने 16 सप्टेंबरला 50 लाखांचा आकडा पार केला होता. अवघ्या 12 दिवसांमध्ये 10 लाख रुग्ण संख्या वाढली आहे. देशभरात दररोज जवळपास 90 हजार कोरोनारुग्ण आढळत आहे.

देशात कोरोना रिकव्हरी रेट 82.58 टक्के आहे. तर, एक्टिव रुग्ण 15.84 टक्के आणि मृत्यू दर 1.57 टक्के आहे. एकूण टेस्टमध्ये पॉजिटिव्ह येणाऱ्या रुग्णांचा दर 11.58 टक्के आहे. आतापर्यंत एकूण 7,19,67,230 नमुन्यांची चाचणी करण्यात आलेली आहे.