मुंबई दि. २९- राज्यातील सुमारे २८० आयएएस अधिकार्यां चा कॉन्फिडेन्शियल रिपोर्टस असलेल्या फायली मंत्रालयाला २१ जून २०१२ मध्ये लागलेल्या आगीत जळून भस्म झाल्या असल्याचे समजते. माहिती हक्क अधिकार कार्यकर्ते आणि माजी केंद्रीय माहिती आयुक्त शैलेश गांधी यांनी माहिती अधिकारात यासंबंधी केलेल्या अर्जाला सरकारकडून हे उत्तर देण्यात आले आहे.
मंत्रालयाच्या आगीत जळल्या कॉन्फिडेन्शियल फायली
श्री.गांधी यांनी डिसेंबर २०१२ला यासंबंधीची विचारणा करणारा अर्ज केला होता. २०११ -१२ या काळात व त्यापूर्वीच्या दोन वर्षात राज्यातील आयएएस अधिकार्यांअच्या अेसीआर बाबत विचारणा केली होती. तेव्हा सार्वजनिक प्रशासन विभागात जेथे या सर्व फायली ठेवण्यात आल्या होत्या, त्या सर्व आगीत जळून भस्मसात झाल्याचे सांगण्यात आले. या विभागाच्या १० नंबरच्या कक्षात या फायली होत्या असे समजते. या फायलीत या अधिकार्यांयचे मूळ अेसीआर होते.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आग लागल्यनंतर लगोलग मंत्रालयातील २.२५ लाख फायलींचे डिजिटायझेशन व ३.१८ कोटी पेपरचे स्कॅनिंग त्यापूर्वीच पूर्ण झाले असल्याचे सांगितले होते मात्र तरीही ८.८२ कोटी पानांचे स्कॅनिंग होणे बाकी होते आणि ते सर्व आगीत जळून गेले आहेत असे सांगण्यात येत आहे.
