मोफत बघायचे आहे आयपीएल ? करा हे मोबाईल रिचार्ज


कोरोना संकटाच्या काळात आजपासून आयपीएल सुरू होत आहे. आयपीएलचे सत्र भारतात एखाद्या उत्सवापेक्षा कमी नसतो. आज मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्समध्ये पहिला सामना सायंकाळी 7.30 वाजता खेळला जाणार आहे. जर तुम्ही देखील क्रिकेट फॅन असाल आणि आयपीएल पाहण्याचा आनंद घ्यायचा असाल तर मोबाईल रिचार्जद्वारे मोफत याचा फायदा घेऊ शकता. रिलायन्स एअरटेल आणि भारती एअरटेलच्या अनेक प्लॅन्समध्ये डिज्नी+ हॉटस्टार व्हीआयपीचे सब्सक्रिप्शन मोफत मिळते.

जिओ 499 रुपयांचा प्लॅन –

जिओच्या या प्लॅनचा कालावधी 56 दिवसांचा आहे. यात युजर्सला कोणतेही एसएमएस आणि कॉलिंग सेवा मिळत नाही, मात्र दररोज 1.5 जीबी डेटा मिळतो. सोबतच 1 वर्षासाठी डिज्नी+ हॉटस्टारचे स्बस्क्रिप्शन मोफत मिळते.

जिओ 777 रुपयांचा प्लॅन –

जिओच्या या प्लॅनचा कालावधी 84 दिवस असून, यात दररोज 1.5 जीबी डेटासोबत 5 जीबी बोनस डेटा देखील मिळतो. याशिवाय जिओ टू जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी 3000 मिनिट्स मिळतात. यात दररोज 100 मोफत एसएमएस आणि  डिज्नी+ हॉटस्टारचे स्बस्क्रिप्शन देखील मिळेल.

एअरटेल 599 रुपयांचा प्लॅन –

एअरटेलच्या 599 रुपयांच्या प्लॅनचा कालावधी 56 दिवसांचा असून, यात दररोज जीबी डेटा मिळतो. प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएस मिळेल. याशिवाय 1 वर्षांसाठी मोफत ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी+ हॉटस्टारचे देखील स्बस्क्रिप्शन मिळते.

एअरटेल 2,698 रुपयांचा प्लॅन –

एअरटेलच्या या प्लॅनमध्ये देखील मोफत आयपीएल पाहण्यास मिळेल. या प्लॅनचा कालावधी 365 दिवस (1 वर्ष) आहे. प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर मोफत कॉलिंग, दररोज 100 एमएमएस आणि 1 वर्षासाठी डिज्नी+ हॉटस्टारचे मोफत स्बस्क्रिप्शन देखील मिळेल. या रिचार्जद्वारे युजर्स मोफत आयपीएलचा आनंद घेऊ शकतील.