नवी दिल्ली: दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील आणखी एक आरोपी अल्पवयीन असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी न्यायालयात केला. त्यामुळे त्याचा खटला देखील बाल न्यायालयात चालवावा; अशी मागणी त्यांनी केली. मात्र पोलिसांनी त्याचे वय २० वर्ष असल्याचे सांगितले.

दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील जिम मध्ये प्रशिक्षक म्हणून काम करणारा आरोपी विनय शर्मा हा अल्पवयीन असल्याचा दावा न्यायालयात केल्याचे त्याचे वकील ए. पी. सिंग यांनी पत्रकारांना सांगितले.
दरम्यान; या खटल्याची सुनावणी दिल्लीबाहेरच्या न्यायालयाकडे वर्ग करावी; अशी मागणी आरोपींनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. दिल्लीमध्ये या प्रकरणाबाबत मोठ्या प्रमाणावर जनप्रक्षोभ असून अजूनही या प्रकरणी जंतरमंतर येथे आंदोलने होत आहेत. आरोपींना फासावर लटकविण्याची मागणी होत आहे. या प्रकारामुळे न्यायालयावर जनप्रक्षोभाचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोपींना या ठिकाणी न्याय मिळण्याची शाश्वती नसल्याने हा खटला इतरत्र वर्ग करावा; अशी विनंती आरोपींच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली असून न्यायालय याबाबत मंगळवारी सुनावणी घेणार आहे.