
जयपूर: व्यवस्था बदलून सर्वसामान्य भारतीय नागरिकांना दिलासा देण्यासाठी सत्ता मूठभर लोकांच्या हाती न एकवटता तिचे विकेंद्रीकरण करणे आवश्यक असल्याचे मत काँग्रेसचे नवनियुक्त उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले.

जयपूर: व्यवस्था बदलून सर्वसामान्य भारतीय नागरिकांना दिलासा देण्यासाठी सत्ता मूठभर लोकांच्या हाती न एकवटता तिचे विकेंद्रीकरण करणे आवश्यक असल्याचे मत काँग्रेसचे नवनियुक्त उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले.
उपाध्यक्ष पदावरून प्रथमच संबोधित करताना गांधी यांनी सर्वांचे आभार मानले. पक्षाने आपल्यावर मोठी जबाबदारी टाकली असून यापुढे काँग्रेस कार्यकर्ता प्रत्येक भारतीय नागरिकासाठी काम करेल; अशी ग्वाही गांधी यांनी दिली. देशाची खऱ्या अर्थाने प्रगती करायची असेल तर ठराविक लोकांच्या हातात सत्ता असून उपयोगाचे नाही. व्यवस्थेत वेगाने बदल करणे आवश्यक असून देशाचा कारभार चालविण्यास सक्षम असलेल्या ४०- ५० नेत्यांना घडविण्याचे आपले उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या भ्रष्टाचारात आकंठ बुडलेले लोकंच भ्रष्टाचाराबाबत कंठशोष करीत असल्याचा आरोप गांधी यांनी केला. काँग्रेस ही महात्मा गांधी यांचे संघटना आहे. मात्र विरोधी पक्ष हे समजून घेण्यास तयार नाही; अशी टीकाही त्यांनी केली.
दुसरीकडे विरोधी पक्षांनी राहुल गांधी यांच्या ‘बढतीवर कठोर टीका केली आहे. काँग्रेस पक्षाने राहुल यांना बढती देऊन जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला घराणेशाहीचा देश बनविला आहे; अशा शब्दात राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते अरुण जेटली यांनी काँग्रेसवर हल्ला चढविला. काँग्रेसच्या चिंतनशिबिरात केवळ राहुल यांच्या बढतीची घोषणा झाली. देशाला भडसाविणाऱ्या महागाई, भ्रष्टाचार आणि कुशासन अशा प्रश्नांची उत्तरे दिलेली नाहीत; असेही ते म्हणाले.