जयपूरः गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हेच भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील आणि त्यांचे नाव घोषित करताच राष्ट्रीय लोकशाही आघाडीत उभी फूट पडेल. त्यानंतर काँग्रेसचा विजय निश्चित आहे; असा दावा कॉंग्रेस खासदार मणिशंकर अय्यर यांनी केला.

भारतीय जनता पक्षात पंतप्रधानपदासाठी कुत्र्या-मांजरांसारखी मारामारी सुरू असून त्यांनी आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करून दाखवावा; असे आव्हान; अय्यर यांनी दिले. भाजप हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हातातील बाहुले असल्याची टीकाही त्यांनी केली.
काँग्रेस पक्षाच्या चिंतन शिबिराबद्दल भाजपला उत्सुकता आहे. मात्र त्यांनी शब्दच्छल करून काँग्रेसचे हे ‘चिंतन’ शिबीर नसून ‘चिंता’ शिबीर असल्याची टीका केल्याचे सांगून अय्यर म्हणाले की; भाजप संघाच्या हातातील केवळ बाहुले असल्याने ते अशा स्वरूपाचे चिंतन शिबीर आयोजित करूच शकत नाहीत.
अय्यर यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजप नेते कीर्ती आझाद यांनी; सर्व काँग्रेसजन हे एक कुटुंबाचे पाळीव प्राणी असल्याची टीका केली.