फॅब्लेटचे बाजारात बस्तान बसले

फॅब्लेट, फोनलेट, ट्वीनर, सुपर स्मार्टफोन अशा अनेक नांवानी परिचित असलेल्या टॅब्लेटच्या आकारच्या मोबाईल फोननी बाजारात आपला चांगलाच जम बसविला असून २०१३ हे वर्ष फॅब्लेटचे असेल असे स्ट्रॅटिजी अॅनॅलिटिव्ह ग्लोबल वायरलेसचे कार्यकारी संचालक नील मॉस्टन यांनी सांगितले. दोन वर्षांपूवी बाजारात आलेले हे उपकरण आता बाजारात चांगलेच स्थिरावले असल्याचे ते म्हणाले.

सॅमसंग गॅलॅक्सी नोट स्वरूपात हे उपकरण प्रथमच बाजारात आले आणि आता विविध कंपन्यांनी त्यांची याच दर्जाची उपकरणे बाजारात आणली आहेत. लास वेगास येथे होत असलेल्या आठवड्याच्या कस्टमर इलेक्ट्रॅानिकस शो मध्ये चीनी टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातील झेडटीई आणि कॉपी हुवाई या कंपन्यांनीही त्यांचे स्वतःचे फॅब्लेट सादर केले असून सर्वेक्षणानुसार मोठ्या स्क्रीनच्या फॅब्लेटना ग्राहकांची अधिक पसंती आहे असे आढळून आले आहे. झेडटीईचे डिझायनिग इटालियन माणसाने केले आहे व त्याचे नामकरण न्यूबिया फॅब्लेट असे केले गेले आहे. याचा स्क्रीन पाच इंची आहे तर हुवाईच्या फॅब्लेटचा स्क्रीन ६.१ इंच आहे.
 
एरिक्सन्स मोबिलीटी रिपोर्टनुसार प्रत्येक स्मार्टफोनच्या महिन्याच्या डेटा ट्रॅफिकमध्ये आत्तापासून ते २०१८ पर्यंत चौपट वाढ अपेक्षित आहे तर पाच इंचापेक्षा मोठा स्क्रीन असलेल्या फॅब्लेटची मागणी याच काळात नऊपटीने वाढणार आहे. ही मागणी या काळात २२८ दशलक्षांवर जाण्याची शक्यता असून विविध कंपन्या आपले उत्पादनाचे प्रमाण वाढवितील तशा किमतीही कमी होतील.

एशिया पॅसिफिक आज आणि पुढील काळातही जगातील सर्वात मोठे मार्केट राहणार असल्याचे एबीआय संस्थेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. गेल्या वर्षात या भागाचा मार्केट मधील वाटा ४२ टक्के होता. जपान, दक्षिण कोरिया या मुख्य बाजारपेठा असल्या तरी चीन, भारत आणि मलेशियातूनही फॅब्लेटला मोठी मागणी आहे. उत्पादन वाढीमुळे फॅब्लेटच्या किमती या वर्षातच ३२३ डॉलर्सपर्यंत उतरतील असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Comment