बलात्कारी नेत्याची नागरिकांनी केली धुलाई

चिरांग: महिलेवर बलात्कार केल्याबद्दल आसाममधील काँग्रेस नेत्याला स्थानिक नागरिकांनी यथेच्छ बदडले. पोलिसांनी पीडीत महिलेचा जबाब नोंदवून नेत्यावर गुन्हा दाखल केला आहे.

बोडोलँड टेरिटोरियल कौन्सिलच्या काँग्रेस कमिटीचा संयोजक विक्रमसिंग ब्रम्ह याने एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या महिलेचा आक्रोश ऐकून स्थानिक नागरिक तिच्या घरासमोर जमा झाले. त्यांनी ब्रम्ह याला लाथा, बुक्क्या, बूट, चपला; इतकेच नव्हे तर जी वस्तू हाताला येईल त्या वस्तूने झोडपले. या अनपेक्षित मारझोडीने हतबल झालेला ब्रम्ह जमावासमोर गयावया करीत होता. माफी मागत होता. दयेची याचना करीत होता. मात्र लोकांनी त्याला भरपूर चोप दिला.