सध्या विशाल भारद्वाज आगामी काळात येत असलेल्या ‘मटरू की बिजली का मनडोला’ या सिनेमाची अभिनेत्री अनुष्का शर्माची तारीफ करीत आहे. तर दुसरीकडे मात्र अनुष्काच्या मते या सिनेमातील बिजलीचा रोल साकारणे सोपे नव्हते. बिजलीची भूमिका साकारणे हे आतापर्यंत साकारलेल्या रोलपेक्षा खूप वेगळे आणि अवघड असे काम होते. या रोलसाठी तिला भाषेवर सुद्धा ध्यान द्यावे लागत होते. हा रोल तिच्या कारकीर्दीच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. अनुष्काने बिजलीच्या रोल साठी १०० टक्के मेहनत घेतली आहे.
‘मटरू की बिजली का मनडोला’ हा सिनेमा येत्या ११ जानेवरी रोजी रिलीज होत आहे. या सिनेमात इमरान खान, पंकज कपूर, शबाना आजमी, अनुष्का शर्मा लीड रोल करीत आहेत. हरियाणाच्या पृष्ठभूमिवर तयार करण्यात आलेल्या या सिनेमात सर्व काही मसाले भरले आहेत. या सिनेमात आर्य बब्बर सुद्धा वेगळा रोल करीत आहे. मात्र त्याच्या रोलबाबत आतापर्यंत काही सांगण्यात आलेले नाही.
या सिनेमात अनुष्का शर्मा पंकज कपूरची मुलगी आहे. या सिनेमात अनुष्का खुपच हॉट अंदाजअध्ये दिसणार आहे. इमरान सोबत तिचे काही हॉट सीन आहेत. अनुष्का, इमरान खान आणि विशाल भारद्वाज सोबत पहिल्यादा काम करीत आहे. या सिनेमातील गाणे टॉप टेन मध्ये सहभागी झाले आहेत. ‘ओमकारा’ आणि ‘इश्कियां’ सारख्या सिनेमाची निर्मिती करणा-या विशाल कडून प्रेक्षकाच्या खूप काही अपेक्षा आहेत. त्यामुळे सर्वजण त्याचा सिनेमा रिलीज होण्याची वाट पाहत आहेत. तिकडे इमरान खान सुद्धा बॉक्सऑफिसवर सिनेमा हिट व्हावा म्हणून वाट पाहत आहे.