नवी दिल्ली: नवी दिल्ली: बलात्कार करणार्यांना केवळ फाशी देऊन भागणार नाही; तर त्याच्या काळजाचा थरकाप व्हावा यासाठी त्यांना रासायनिक उपायांनी नपुंसक बनविणे आवश्यक आहे; असे मत भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते व्यंकैय्या नायडू यांनी व्यक्त केले. त्याच्या या वक्तव्याने या मुद्द्याबाबत भाजपने काँग्रेसची री ओढल्याचे स्पष्ट होत आहे.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी कडक कायदा करण्यासाठी काँग्रेस पक्षाने मसुदा तयार केला असून हा मसुदा न्या. जे. वर्मा यांना सदर करण्यात येणार आहे. या मसुद्यात बलात्कारातील आरोप सिद्ध झालेल्यांना षंढ करण्याची शिक्षा काँग्रेसने सुचविली आहे.
महिलांना सुरक्षितता प्रदान करणारा कायदा करताना सरकारला सल्ला देण्यासाठी सरकारने न्या. वर्मा यांची समिती नियुक्त केली आहे. या समितीला हा मसुदा काँग्रेस सदर करणार आहे. या मसुद्यात बालात्कार्यांना रासायनिक प्रक्रियेद्वारे षंढ करण्याची शिक्षा ठोठावण्यात यावी; अशी सूचना करण्यात आली असून ३० वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षाही सुचविण्यात आली आहे.
बलात्काराच्या खटल्याची त्वरेने सुनावणी व्हावी अशी पक्षाची मागणी असून त्यासाठी द्रुतगती न्यायालयात ९० दिवसात सुनावणी पूर्ण करण्यात यावी; असे पक्षाने तयार केलेल्या मसुद्यात नमूद केले आहे.