अभिनेता अक्षय कुमार सध्या डायटवर पूर्णपणे कंट्रोल ठेवत आहे. त्त्यामुळेच त्याने गेल्या कित्येक वर्षापासून साधी मिठाई सुद्धा खाल्ली नाही. तेवढ्या साठीच तो पार्टिमध्ये सुद्धा कमी प्रमाणात जातो. पार्टीमुळे त्याच्या दररोजच्या दिनचर्यावर फरक पडत असल्याने तो हे सर्व काही करणे नेहमीच टाळतो. त्यामुळेच अक्षय हा नेहमीच फीट दिसतो.
याबाबत अक्षय कुमारची नुकतीच मुलाखत घेतली आहे. त्यावेळी अक्षय म्हणाला, ‘ पैसे देऊन सर्व काही खरेदी करू शकतो. मात्र चांगले शरीर कमवण्यासाठी व्यायाम करणे गरजेचे आहे. त्यासाठी खाण्या-पिण्यावर सुद्धा प्रतीबंध घालणे आवश्यक आहे. उशिरा झोपणे आणि उशिरा उठणे यामुळे शरीराला नुकसान होते. याशिवाय अनियमित खाण्यामुळे सुद्धा शरीरला त्रास होतो. डायटिंगला तर माझा पूर्ण विरोध आहे, त्यासाठी फक्त खाण्याची पद्धत आणि वेळ योग्य असणे गरजेची आहे.’
शरीर आणि तुमच्या वयानुसार एक्सरसाइज करायला हवा. जर तुम्ही मोठे असाल तर जोरात चालले पाहिजे. त्यासठी आवश्यक असेलली एक्सरसाइज करा ज्यामुळे शरीर कमी होईल. जास्त वजन उचलण्याच्या एक्सरसाइजमुळे मांसपेशिया खराब होण्याची शक्यता असते. तसे पहिले तर जिममध्ये ट्रेनरच्या सल्ल्यानुसार एक्सरसाइज करणे अधिक सोयीचे आहे. त्याशिवाय जास्तीत जास्त चलने आणि सावकाश पळण्याचा व्यायाम सुरु करा. त्याशिवाय योगाची मदत घेणे चांगले असा सल्ला सुद्धा अक्षयने यावेळी दिला.