प्रियंका,गोविंदाचा सिनेमा होतोय रिलीज

प्रियंका आणि गोविंदा या जोडीचा ‘दीवाना हूं मैं’ हा सिनेमा येत्या काळात रिलीज होत आहे. फिल्ममेकर के. सी. बोकाडि़याने हा सिनेमा खूप दिवसापूर्वी तयार केला होता. मात्र सिनेमासाठी बायर्स मिळाले नसल्याने हा सिनेमा रिलीज झाला नव्हता. मात्र गेल्या काही दिवसपासून हा सिनेमा रिलीज करण्याचे ठरले आहे.

या सिनामामध्ये थोडासा मसाला मिक्स करण्यात आला आहे. त्यानंतर बोकाडि़याने या सिनेमात प्रियंकाचे एक आयटम सॉंग घातले आहे. सध्या सिनेमा हिट होण्यासाठी आयटम सॉंग महत्वाचे मानले जाते. त्यामुळे बोकाडि़याने या सिनेमात आयटम सॉंग घेतले आहे. प्रियंका सोबतचा काही पोर्शन रीशूट केला आहे. मात्र हे करीत असतना ते या सिनेमाचा हीरो गोविंदाला मात्र विसरले आहेत. त्याने री-शूट करतना गोविंदाला काही बोलावले नाही.

एवढेच नव्हे तर गोविंदाला त्याचा सिनामा येत्या काळात रिलीज होणार आहे हे माहित देखील नाही. सूत्रोंने दिलेल्या माहितीनुसार, फिल्ममेकरला वाटते की गोविंदामध्ये तेंव्हापासून आजपर्यंत खूप बदल झाला आहे. त्यामुळे गोविंदा सोबत री-शूट करने फायद्याचे ठरले नसते. मात्र प्रियंका सध्या सिनेमामध्ये काहीच मानधन न घेता काम करीत आहे. या सिनेमाची प्रियंकाने पेंडिंग पेमेंट सुद्धा घेतली नाही.आयटम सॉंग सुद्धा तिने फ्री मध्ये शूट केले आहे.

याबाबत गोविंदा म्हणाला, ‘ सिनेमा रिलीज होत आहे. मात्र याबाबत मला काहीच माहित नाही. बोकाडि़याकडून मला आतपर्यंत तरी कॉल आलेला नाही. त्यामुळे मी काहीच बोलू शकत नाही.’