एकदा कमिटमेंट केली की कोणाचेच तो काही ऐकत नाही. हा डायलॉग जरी गेल्या काही दिवसापासून सलमान खानचा स्लोगन झाला असला तरी अमलात मात्र शाहरुख खानने आणला आहे. किंग खान दिलेल्या कमिटमेंट्स पूर्ण करण्यावरून कधी मागे हटत नाही. काही दिवसापूर्वीच शाहरुखने त्याचे एक उदाहरण देखील दाखवून दिले.
पॉलिटिशन राजीव शुक्लाचा पुतण्या अभिनव शुक्लाचे लग्नानिम्मित मुंबईमध्ये एका पार्टी ऑर्गनाइज केली होती. शाहरुख खानला या पार्टीसाठी इन्वाइटेड करण्यात आले होते. त्यादिवशी शाहरुखच्या सिनेमाची शूटिंग सुरू होती. मात्र दिलेला शब्द पाळण्यासाठी पर्सनल चार्टडमधून मुंबईमध्ये फंक्शन अटेंड करण्यासाठी तो हजर झाला. एवढेच नव्हे या पार्टीत काही काळ सहभागी होऊन परत त्याच चार्टडने निघून गेला.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार शाहरुख आपला दिलेला शब्द नेहमीच पाळत असतो. काही दिवसापूर्वी तो ‘चेन्नैइ एक्सप्रेस’ या सिनेमाची शूटिंग गोवामध्ये करीत होता. त्यावेळी मुंबईमध्ये त्त्याला सोशलाइट मित्राची पार्टी अटेंड करायची होती. त्यावेळी किंग खान त्याच्या पर्सनल चार्टरमधून मुंबईला आला. त्यानंतर एक तास याठिकाणी थांबून रात्रीच परत गोव्याला आला. यावेळी त्याने त्याच्या कुटूबाची सुद्धा भेट घेतली नाही. त्याला तेवढाच वेळ देण्यात आला असल्याने तो परत शूटिंगच्या ठिकाणी वेळेत हजर झाला.