
मुंबई: देशातील सुप्रतिष्ठीत आणि उज्ज्वल परंपरा असलेल्या टाटा उद्योग समुहाचे सहावे प्रमुख म्हणून सायरस मिस्त्री यांनी सूत्रे स्वीकारली.

मुंबई: देशातील सुप्रतिष्ठीत आणि उज्ज्वल परंपरा असलेल्या टाटा उद्योग समुहाचे सहावे प्रमुख म्हणून सायरस मिस्त्री यांनी सूत्रे स्वीकारली.
जे. आर. डी. टाटा यांनी पालन पोषण करून जतन वाढविलेल्या वृक्षाचे वटवृक्षात रुपांतर करण्याचे कार्य नुकतेच निवृत्त झालेले अध्यक्ष रतन टाटा यांनी केले. मिठापासून ते सोफ़्टवेअरपर्यंत अनेक उत्पादने करणाऱ्या टाटा उद्योग समूहात शंभराहून अधिक कंपन्यांचा समावेश असून समूहाचा कारभार जगातील ८० देशात विस्तारलेला आहे. समूहाच्या उत्पादनांची ८५ देशात निर्यात होत आहे.
रतन टाटा यांनी समूहाची सूत्रे स्वीकारली तेव्हा १० हजार कोटीची असलेली उलाढाल आता तब्बल ५ लाख कोटी रुपये एवढी आहे. समूहाच्या ३२ कंपन्या जगभरातील विविध शेअर बाजारात नोंदणीकृत असून ३८ लाखाहून अधिक शेअरधारक आहेत. एवढा मोठा कारभार सांभाळणे मिस्त्री यांच्यासाठी निश्चितपणे आव्हानात्मक असणार आहे.