मुंबई: राज्यातील कोणत्याही कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न काँग्रेसने करू नये. राज्यात काँग्रेस एकटीच सत्तेवर नसून आघाडीचे सरकार आहे; याची जाणीव ठेवावी; अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी काँग्रेसला फटकारले आहे.

काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला काँग्रेसने ‘वचनपूर्ती मेळावा’ असे नामाभिधान दिले आहे. निवडणुकीत पक्षाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केल्याचे ‘मार्केटींग’ करण्याचा काँग्रेसचा हा प्रयत्न असल्याची राष्ट्रवादीची भावना आहे.
मात्र जाहीरनाम्यावर काँग्रेस पक्षाचे एकट्याचे नाव नसून तो आघाडीचा जाहीरनामा आहे. केंद्रातही राष्ट्रवादी काँग्रेस हा संयुक्त पुरोगामी आघाडीतील महत्वाचा पक्ष आहे. त्यामुळे ‘इंदू मिल’चा विषय असो; व इतर कोणताही; काँग्रेसने त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये; असा इशारा पिचड यांनी दिला.