होय ही बातमी खरी आहे….आपला सर्वांचाच लाडका टायगर सल्लू मिया लग्न करण्यासाठी राजी झाला आहे. एकीकडे बॉलीवुडमधील सर्वच मोस्ट एलिजिबल बैचलर मंडळीने लग्न केले आहे. नाही तरी निदान आतापासूनच कुणासोबत तरी सेटिंग केली आहे. केवळ अपवाद सलमान खानचा होता. आतापर्यंत लग्नाचे नाव काढला की कोणतेही कमेंट न देना-या सलमानने चक्क एका मुलाखतीवेळी जोधपुर कोर्ट आणि मुंबई कोर्टातील केसचा निर्णय लागल्यानंतर लग्न करणार असल्याचे सांगितले. केवळ आतापर्यंत या केसचा निर्णय न लागल्याने पत्नीला व मुलांना जेलमध्ये येण्याची वेळ येऊ नये म्हणून लग्न केले नसल्याचे सांगून सर्वांनाच ऐन ख्रिसमसच्या मुहूर्तावर सुखद धक्का दिला आहे.
सलमान कोर्टाच्या निर्णयानंतर लग्न करणार असल्यचे समजल्याने त्याच्या लाखो फैन्स सोबतच त्यच्या परीवारातील मंडळी सुद्धा आनदी झाली आहे. गेल्या कित्येक दिवसापासून किती तरी युवतीने त्याच्यासोबत लग्न करण्यची तयारी दर्शविली होती. मात्र आतापर्यंत सलमानच तयार नव्हता. अभिनेत्री संगीता बिजलानी, सोमी आली त्यानंतर ऐश्वर्या रॉय यांच्या प्रेमात तो पडला होता अशी चर्चा होती. मात्र त्यांनी इतरासोबत लग्न केल्याने ही फक्त चर्चाच होती. सध्या कैतरिना कैफ सोबत त्याचे नाव जोडले जात आहे. तो कोणासोबत का लग्न करेना याला फार काही महत्व नाही पण त्यांने लवकर लग्न करावे असे त्याच्या लाखो फैन्सचे म्हणने आहे.
लवकरच २०१२ हे वर्ष संपत आहे. त्यामुळे आता यावर्षी तर त्याचे लग्न होणार नाही. मात्र पुढील वर्षी म्हणजे २०१३ साली जोधपुर कोर्ट आणि मुंबई कोर्टातील केसचा निर्णय लागावा यासाठी त्याच्या चाहत्याना देव पाण्यात ठेवावे लागणार आहेत. तरच सलमानचा विवाह २०१३ साली तर होईल. अन्यथा कोर्टाच्या केसप्रमाणे पुढे तारीख वाढणार नाही ना याची काळजी खूद सलमानला आगामी काळात घ्यावी लागणार आहे. एवढे मात्र निश्चित.