बॉलीवुडमध्ये आतापर्यंत आलेल्या साउथ साइरन्सने जीवनसाथी निवडताना पूर्वीलग्न झालेल्या व्यक्तिसोबतच लग्न करणे पसंत केले आहे. या लिस्टमध्ये आत्ता नव्याने एक नाव समाविष्ट झाले आहे. अभिनेत्री विद्या बालन सिद्धार्थ रॉय कपूरची तिसरी पत्नी झाली आहे. विद्याशी लग्न करण्यापूर्वी सिद्धार्थ रॉय कपूरचे दोन लग्न झाले आहेत. तसे पहिले तर भारतात युवकाची काही कमी नाही. विशेषता लग्न करतेवेळी या सर्वच अभिनेत्रीचे करियर उंचीवर असताना पण त्यांनी विवाहित व्यक्तीशी लग्न करणे पसंत केले. फक्त अभिनेत्री ऐश्वर्या रॉय मात्र याबाबतीत लकी ठरली असून तिने अविवाहित असलेल्या अभिषेक बच्चन सोबत लग्न केले.
पतीच्या बाबतीत ऐश्वर्या लकी
१९८० च्या दशकात अभिनेत्री हेमा मालिनीने विवाहित असलेल्या अभिनेता धर्मेन्द्र सोबत लग्न करणे पसंत केले. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव प्रकाश कौर आहे. आतापर्यंत धर्मेन्द्रने तिला घटस्फोट ही दिलेला नाही. त्यानंतर आपल्या अभिनयाने घायाळ करणा-या श्रीदेवीने देखील विवाहीत असलेल्या बोनी कपूर सोबत संसार थाटला.
शिल्पा शेट्टीने उद्योगपती राज कुंद्राची जीवनसाथी म्हणून निवड केली. राजने शिल्पासोबत लग्न करण्यासाठी पाहिली पत्नी कविताला घटस्फोट दिला होता. आमिर खानने देखील डायरेक्टर किरण रावला दूसरी पत्नी म्हणून घरी आणले. यापूर्वी आमिरने रीना सोबत लवमैरेज केले होते. आमिर आणि रीनाला जुनैद आणी इरा अशी दोन मुले आहेत. त्यामुळेच या सर्व साउथ साइरन्सच्या तुलनेत अभिनेत्री ऐश्वर्या रॉयला मात्र याबाबतीत लकी मानले जात आहे.
