भारतसुद्धा ‘बोल्ड’ देश- अनुष्का शर्मा

गेल्या काही दिवसापासून ‘मटरु की बिजली का मंडोला’ या सिनेमातील इमरान खान सोबतच्या एका किसिंग सीनमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या वेगवेगळे निष्कर्ष काढत आहे. काही दिवसापूर्वीच तिला भारत हा एक ‘बोल्ड’ देश असल्याचा साक्षात्कार झाला आहे. त्यामुळे सध्या बॉलीवूडमध्ये हा एक चर्चेचा विषय झाला आहे.

याबाबत अधिक बोलताना अनुष्का म्हणाली, ‘ भारताची लोकसंख्या १२० कोटी इतकी आहे. त्यामुळेच भारतसुद्धा एक बोल्ड देश असल्याचे दिसत आहे. हे सर्व काही तिने फक्त संदर्भासाठी सांगितले आहे. आगामी काळात येत असलेल्या तिच्या ‘मटरु की बिजली का मंडोला’ सिनेमात इमरान खान आणि अनुष्का शर्मा या दोघात एक किसिंग सीन आहे. त्याची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे.

अशा स्वरूपचा बोल्ड सीन करताना अनुष्काला काही अडचण वाटली नाही का? असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. यावेळी ती म्हणाली , ‘ मला काहीच समजत नाही की, भारतासारख्या बोल्ड देशामध्ये किस सीन केल्यानंतर हल्ला का होतो. १२० कोटीच्या या देशात किस सीनला बोल्ड म्हणणे मला तर चेष्टा केल्या सारखे वाटते. किसिंग सीन पडद्यावर दाखवला जातो तसेच काही शूटिंगवेळी घडत नाहीं. शूटिंग ही मैकेनिकल अंदाजामध्ये होते. कैमरामैन येउन शॉट कुठल्या एंगलने हवा आहे ते सांगतो. त्यानंतर लाइटिंग आडजस्ट केली जाते. त्यानंतर किसिंग सीन शूट करण्यात येते. त्यामध्ये इमोशन असे काहीच नसते.’