कंगना साकारणार कोठ्यातील नर्तकी

साहित्यिक विश्वास पाटील हे ’रज्जो’ नावाच्या चित्रपटाद्वरे दिग्दर्शन क्षेत्रात उतरणार असून, त्यांनी या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेसाठी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतसोबत करारही केला आहे.

ती सध्या करण जोहरच्या चित्रपटाबरोबरच राकेश रोशनच्या ’क्रिश-३’ मध्ये नव्याने भूमिका साकारत आहे. कंगना राणावत एक प्रतिभावंत अभिनेत्री आहे. मात्र तिला जास्त संधी मिळालेली नाही. छोट्या शहरातून करिअर करण्यासाठी आलेल्या कंगनाला या उद्योगातील दुनियादारीचे ज्ञान नाही. ’रज्जो’मध्ये ती कोठ्यात नाचणार्याद एका मुस्लीम मुलीची भूमिका करीत आहे.