ग्लॅमरस भूमिकेसाठी गुणवत्ता आवश्यक – दीपिका

ग्लॅमरस भूमिकाही महत्त्वाच्या असतात. ग्लॅमरस भूमिका साकारण्यासाठी गुणवत्ता आवश्यकता नाही, हा एक भ्रम आहे. कारण शेवटी ग्लॅमरस अथवा ’डी-ग्लॅम’ कोणत्याही चित्रपटात अभिनयाची गरज असते आणि अभिनय हा अभिनयच असतो, असे दीपिका पादुकोनचे मत आहे. दीपिकाच्या चाहत्यांना ग्लॅमरस भूमिकांबद्दल काय वाटते ते माहित नाही, पण अशा भूमिका करण्यासाठी गुणवत्तेची आवश्यकता नसते, असे लोक जेव्हा म्हणतात तेव्हा दीपिकाला खूप वाईट वाटते.

दीपिकाने ग्लॅमरस आणि इतर भूमिकाही साकरल्या आहेत. ती म्हणाली, लोकांच्या मते मी कॉकटेलमधील व्हेरोनिका उत्कृष्टपणे साकारली होती, पण ती देखील ग्लॅमसरच भूमिका होती. माझ्यासाठी ग्लॅमरपेक्षा चित्रपट आणि त्यातील भूमिका महत्त्वाची असते. २६ वर्षीय दीपिकाने ओम शांती ओम मधून बॉलिवूडच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ’बचना ऐ हसीनो’, ’हाऊसफुल’, ’लव्ह आजकल’ आणि ’कॉकटेल’ असे यशस्वी चित्रपट तिने दिले आहेत.