इंग्लंडच्या संथ फलंदाजीमुळे नागपूर कसोटी अनिर्णयित अवस्थेकडे झुकली आहे. पाचव्या दिवशीही भारतीय गोलंदाजांना विकेट काढण्यात अपयश आले आहे. जॉनथन ट्रॉटने शतक पूर्ण केले आहे. त्याने २३१ चेंडुंमध्ये १४ चौकारांसह शतक साजरे केले. या पूर्वीच इंग्लंडने मालिकेत २-१ अशी आघडी घेतली आहे. त्यमुळे हा कसोटी सामना अनिर्णयित राहिल्यास भारत या मालिकेत पराभूत होणार आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा इंग्लंडने ३ गडी बाद २४० धावा केल्या होत्या.
चौथ्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी इंग्लंडचा जोनाथन ट्रॉट ६६ आणि इयान बेल २४ धावांवर खेळत होते. दिवसभरात जवळपास ९ षटकांत फक्त १९० धावा निघाल्या आणि चार गडी बाद झाले. कालच्या ३ बाद १६१ धावावरून पुढे खेळ सुरु केला. पाचव्या दिवशी ट्रॉट आणि इयन बेल यांनी शतकी भागीदारी करुन भारताची विजयाची आशा संपुष्टात आणली आहे. त्यामुळे भारताला लाजीरवाण्या मालिका पराभवाला सामोरे जावे लागणार आहे. जॉनथन ट्रॉटने सातत्य दाखवून संयमी खेळी केली. तर इयन बेलने अर्धशतक पूर्ण केले. दोघांनी शतकी भागीदारी करुन इग्लंडची आघाडी २०० धावांवर नेली.
नागपूर येथील हा चौथा कसोटी सामना अनिर्णयित राहिल्यास भारत या मालिकेत पराभूत होणार आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा इंग्लंडने ३ गडी बाद २४० धावा केल्या होत्या.