गेल्या काही दिवसापासून सर्वत्र सलमान खानच दिसत आहे. शुक्रवारी रिलीज होत असलेल्या ‘दबंग -२’ ची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. सध्या सलमान खान त्याच्या या सिनेमातील लुकमध्ये सर्वत्र दिसत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनचे काम त्यांनी खूप मनावर घेतले आहे. त्यामुळेच तो सध्या छोटा पडदा व प्रत्येक ठिकाणी लाइव प्रोमो करताना दिसत आहे. सलमानने ‘दबंग-२’ चे प्रमोशनचे काम सध्या धुमधडाक्यात सुरु आहे.
सगळीकडे ‘दबंग-२’ ची चर्चा असताना सलमानने मात्र हा सिनेमा अजून पाहिलेला नाही. ‘दबंग-२’ या सिनेमातील त्याच्या भुमिकेबाबत तो सध्या टेन्शन मुक्त आहे. याबाबत सलमानचे ओवर कॉन्फिडेंस म्हणा अथवा समझदारी पण ‘दबंग-२’ हा सिनेमा त्यांनी अजून तरी पहिला नाही. त्यामुळे सलमान स्वता हा सिनेमा कधी पाहणार अशी चर्चा आहे.
सलमान खान पुलिसच्या ड्रेसमध्ये जरी सर्वातर दिसत असला तरी, ‘दबंग -२’ या सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी मात्र तो गैरहजर होता. यावेळी या सिनेमाचे संपूर्ण युनिट व वितरक मंडळी हजर होती. मात्र तो या स्पेशल स्क्रीनिंगकडे फिरकलाच नाही. त्यामुळे सध्या बॉलीवूडमध्ये मात्र वेगळीच चर्चा आहे. एवढे मात्र नक्कीच सलमान बघू अथवा न बघू सिनेमाचे प्रमोशन मात्र जोरात सुरु आहे.