भांडणानंतर शाहरुख काढतोय खुन्नस

बॉक्स ऑफिसवर ख-या अर्थाने लढाई ‘जब तक है जान’ आणि ‘सन ऑफ सरदार’ या दोन सिनेमात होती. खिड़कीवर जेवढी कमाई करायची आहे तेवडी कमाई केली आहे. या दोन सिनेमाच्या फाइटमध्ये कमाईच्या बाबतीत ‘जब तक है जान’ पुढे राहिली आहे. एवढे सगळे काही झाले तरी अजून हे प्रकरण काही शांत झाले नाही. आता याचा प्रभाव दूस-या प्रॉजेक्ट्सवर पडत आहे. शाहरुखला अडचणीत आणण्याचा प्रकार केल्यानंतर आता त्याने खुन्नस काढण्यास सुरुवात केली आहे.

ज्या कंपनीने ‘सन ऑफ सरदार’ या सिनेमाला रिलीज केले होते. त्या कंपनीला शाहरुखने सध्या इग्नोर करण्यास सुरुवात केली आहे. त्या कंपनीसोबत पूर्वी शाहरुखने ‘ओम शांति ओम’ आणि ‘रा.वन’ हे सिनेमे केले होते. मात्र आगामी काळात शाहरुखचे ‘चेन्नैइ एक्सप्रेस’ आणि ‘हैपी न्यू इयर’ हे दोन सिनेमे रिलीज होणार आहेत. त्यासाठी त्याला या कंपनी सोबतच काम करायचे आहे.

तसे पाहिले तर शाहरुख आणि या कंपनीमध्ये वाद ‘रा.वन’ या सिनेमापासून सुरू झाला आहे. शाहरुखच्या ‘रा.वन’ या सिनेमाला चांगले कलेक्शन मिळाले नव्हते. त्यामुळे त्या काही कंपनीने अजय देवगनच्या ‘सन ऑफ सरदार’ सिंनेमला साथ देत हा सिनेमा रिलीज केला होता. त्यामुळेच आता शाहरुख या कंपन्यांना सध्या इग्नोर करीत आहे. अजयने त्या कंपन्याना सोबत घेऊन यशराज फिलम्सवर जोरदार अटैक केला होता. त्यामुळे दोन्ही सिनेमातील कॉम्पिटिशन वाढले होते. त्यामुळेच शाहरुखने हा एक मोठा इशू सध्या केला आहे.